साराबंदी : सीमाप्रश्नासाठीचा पहिला लढा
राज्य पुनर्रचनेतून मुंबई व म्हैसूर राज्यांच्या सरहद्दीच्या प्रश्नाला आंतरराज्य वादाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सरहद्दीचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकसभेने विभागीय मंडळाची योजना केली. पण, दोन वर्षे पूर्ण झाल्यावरसुद्धा प्रश्न दुर्लक्षिला गेला, तेव्हा समितीने आंदोलनाचा निर्णय घेतला व १ नोव्हेंबर १९५८पासून बेळगाव, कारवार, खानापूर, निपाणी व भालकी या पाच केंद्रांवर सत्याग्रह सुरू केला.......